50000 डॉलर केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत रामकुमार रामनाथन, सुमित नागल, एन.विजय सुंदर प्रशांत यांची आगेकुच

50000 डॉलर केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत रामकुमार रामनाथन, सुमित नागल, एन.विजय सुंदर प्रशांत यांची आगेकुच

पुणे, 25 ऑक्टोबर 2016: एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित 50000डॉलर केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत एकेरीत रामकुमार रामनाथन, सुमित नागल, एन.विजय सुंदर प्रशांत या  भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत 1 तास 38मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारताच्या रामकुमार रामनाथन याने रशियाच्या अलेक्झांडर झुर्बिनचा 6-3, 3-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला. अव्वल मानांकित व रशियाच्या एव्हेग्नी डाँस्कॉयने भारताच्या मोहित मयुर जयप्रकाशचे आव्हान 6-4, 6-2 असे सहज मोडित काढले. भारताच्या सुमित नागल याने स्पेनच्या मार्क जिनरचा 7-5, 6-3 असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. एन.विजय सुंदर प्रशांत याने वाईल्ड कार्डव्दारे प्रवेश केलेल्या जयेश पुंगलियाला 6-2, 6-4 असे नमविले.

दुहेरीत पहिल्या फेरीत  अव्वल मानांकित व भारताच्या पुरव राजा व दिविज शरण यांनी सादिक डुबिया व फॅबियन रिबुल यांचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(4)असा पराभव करून आगेकुच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः

पहिली फेरीः एकेरी गटः

 • एव्हेग्नी डाँस्कॉय(रशिया,1)वि.वि.मोहित मयुर जयप्रकाश(भारत)6-4, 6-2;
 • रामकुमार रामनाथन(भारत)वि.वि.अलेक्झांडर झुर्बिन(रशिया)6-3, 3-6, 6-3;
 • सुमित नागल(भारत)वि.वि.मार्क जिनर(स्पेन)7-5, 6-3;
 • अ‍ॅड्रीयन मेनेडेझ-मॅसिअरस(स्पेन,4)वि.वि.शाल्वा डीझनशिआ(रशिया)6-2, 6-2;
 • निकोला मिलोजोविच(सर्बिया)वि.वि.एन.श्रीरामबालाजी(भारत)7-5, 7-6(2);
 • एन.विजय सुंदर प्रशांत(भारत)वि.वि.जयेश पुंगलिया(भारत)6-2, 6-4;
 • डुक ली(कोरिया,2)वि.वि.हुगो न्यास(फ्रांस)6-3, 6-7(4), 6-1;

दुहेरी गटः पहिली फेरीः

 • पुरव राजा / दिविज शरण(भारत)वि.वि.सादिक डुबिया/फॅबियन रिबुल 6-4, 7-6(4);
 • मारट दिवितिरोव्ह / दिमित्री पॉपको वि.वि.अनिरूध्द चंद्रशेखर / विग्नेश पेरणामुल्लर 7-5, 6-4;
 • लुका मार्गारोली / हुगो न्यास वि.वि.जॉन पॉल फ्रुटेरो / अ‍ॅड्रीयन मेनेडेझ-मॅसिअरस 7-5, 7-5.